Kriya and Meditation for Software / IT Professionals. Conducted by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

भगवान दत्तात्रेयांचे सोळा अवतार

मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे पृथ्वीवर अवतरण झाले तो दिवस अर्थात श्रीदत्त जयंती. अवधूतमूर्ती दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानतात हे तर सर्वांनाच माहित आहे. परंतु दत्त संप्रदायात भगवान दत्तात्रेयांचे सोळा अवतार मानण्यात येतात. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामींनी आपल्या श्रीदत्तात्रेय षोडशावतार चरितानि नामक ग्रंथांत या सोळा अवतारांची कथा आणि उपासना पद्धती विस्ताराने वर्णन केली आहे.  विस्तारभयामुळे ती संपूर्ण उपासना विधी-विधानासहित येथे देणे शक्य नसले तरी आजच्या पावन दिवशी त्या सोळा अवतारांचे नाममंत्र खाली देत आहे. त्या नामामंत्रांचा भक्तिपूर्वक केलेला जप किंवा स्मरण सर्वच दत्तभक्तांना उपयोगी ठरेल यात शंका नाही.

१. ॐ योगिराजाय नमः ।

२. ॐ अत्रिवरदाय नमः ।

३. ॐ दत्तात्रेयाय नमः ।

४. ॐ कालाग्निशमनाय नमः ।

५. ॐ योगिजनवल्लभाय नमः ।

६. ॐ लीलाविश्वंभराय नमः ।

७. ॐ सिध्दराजाय नमः।

८. ॐ ज्ञानसागराय नमः ।

९. ॐ विश्वंभरावधूताय नमः ।

१०. ॐ मायामुक्तावधूताय नमः ।

११. ॐ मायायुक्तावधूताय नमः ।

१२. ॐ आदिगुरवे नमः ।

१३. ॐ शिवरुपाय नमः ।

१४. ॐ देवदेवेश्वराय नमः ।

१५. ॐ दिगंबरावधूताय नमः ।

१६. ॐ श्रीकृष्णश्यामकमलनयनाय नमः ।

सर्व वाचकांना श्रीदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 13 Dec 2016