Kriya and Meditation for Software / IT Professionals. Conducted by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

आधी क्षेत्राचे ज्ञान प्राप्त करावे

तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु । बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥
मन आणीकही एकु । विषयांचा दशकु । सुखदुःखद्वेषु । संघातु इछा ॥
आणि चेतना धृति । एवं क्षेत्रव्यक्ति । सांघितली तुज प्रति । आघवी चि हे ॥
~ ज्ञानेश्वरी

सुलभ विवरण : पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये हे दहा, मन,  ज्ञानेंद्रीयांचे पाच आणि कार्मेंद्रीयेंचे पाच असे दहा विषय,  सुख, दु:ख, द्वेष, या सगळ्यांचा समूह, इच्छा,  चेतना आणि धैर्य अशी या क्षेत्राची तत्वे आहेत. आत्मा म्हणजे काय ते जाणून घेण्याआधी शरीर. देह या सर्वसाधारण नावांनी ओळखले जाणारे क्षेत्र काय आहे ते योग्याने नीट समजून घेतले पाहिजे. क्षेत्र नीट समजून घेतले की क्षेत्रज्ञ त्यांपासून वेगळा कसा आहे ते समजणे सोपे जाते. अन्यथा क्षेत्रालाच क्षेत्रज्ञ समजण्याची गल्लत नवख्या साधकाकडून होऊ शकते. आध्यात्मिक दृष्टीने क्षेत्र हे जरी क्षेत्रज्ञापेक्षा कमी प्रतीचे असले तरी त्या वाचून मानवी आयुष्य संभवत नाही. दैनंदिन जीवनात क्षेत्राचा वापर करूनच जीव जगत असतो. सांख्य तत्वज्ञानात सृष्टीतील तत्वांचे विवरण अतिशय काटेकोरपणे आणि शास्त्रशुद्धरीतीने केलेले आहे. भगवत गीता आणि अर्थातच ज्ञानेश्वरी त्याच सांख्य ज्ञानावर येथे भाष्य करत आहेत.बिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 16 Feb 2017