Untitled 1

दिवाळीतील कुल-कुंडलिनी उपासना

तुम्ही सर्व वाचक मंडळी मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात व्यग्र असणार. तुम्हा सर्वांची दिवाळीच्या शुभमुहूर्तावरील योगोपासना सुद्धा श्रद्धेने सुरु असणार याची मला खात्री आहे. तुमची "दिवाळी स्पेशल" योगसाधना सफळ संपूर्ण होवो ही शुभेच्छा.

दिवाळी निमित्त माझ्या मित्रमंडळींपैकी काही योगप्रेमी लोकांकडून "कुल-कुंडलिनी उपासना" करवून घेत आहे. बरेच दिवस "आज करू-उद्या करू" असं चाललं होतं पण काही लोकं अमेरिकेत वास्तव्यास असल्याने सर्वांच्या वेळा जुळून येत नव्हत्या. या दिवाळीच्या निमित्ताने अगदी अनपेक्षित पणे सर्व काही जुळून आले. सलग पाच दिवस सुरु असलेली ऑनलाईन सेशन्स आजच्या शुभ दिवशी ब्रह्ममुहूर्तावर कुल-कुंडलिनीच्या आशीर्वादाने आणि श्रीपराप्रसाद मंत्राच्या साक्षीने पार पडली. म्हणतात ना - "जे घडणार जया काळी, निमित्त करी चंद्रमौळी".

या धावपळीत व्यस्त असल्याने आज विशेष असा लेख नाही. या सेशन्स मधील प्रत्यक्ष क्रियात्मक, साधनात्मक, आणि विधी-विधानात्मक भाग येथे देणे शक्य होणार नाही. तसा उद्देशही नाही. परंतु या सेशन्स मधील काही मोजकी "क्षणचित्रे" खाली देत आहे. या आकृत्या विशिष्ठ क्रमाने वगैरे नाहीत. सेशन्स इंग्रजीमध्ये असल्याने या आकृत्या सुद्धा इंग्रजीत आहेत पण त्याने फारसे काही बिघडणार नाही.

भगवान शंकराच्या पाच मुखांपैकी "ईशान" मुखातून जे ज्ञान बाहेर पडले ते सर्वोच्च मानले जाते. अजपा जप, कुल-कुंडलिनी वगैरे विषय त्यातच येतात.

 

कुंडलिनी शक्तीचेच स्वरूप असलेली प्राणशक्ती मानव पिंडामध्ये २१,६०० वेळा श्वासोच्छ्वास घडवून आणते. जणू दर दिवशी २१,६00 वेळा टिक-टिक करणारे घड्याळच. तीच योग्यांची "अजपा गायत्री". नावे अनेक पण साधना एक. आयुष्यभराची सुखमय साधना आणि "कुल-कुंडलिनी उपासनेतील" एक महत्वाचा भाग.

 

शैव दर्शनानुसार आणव, माया, आणि कर्म या तीन मल / दोषांमुळे जीव आपले शिवत्व विसरतो.

 

काही योगगम्य गोष्टींचा अर्थ विवरण - सूर्याच्या १२ कला, चंद्राच्या १६ कला, आणि अग्नीच्या १० कला. त्यांचा नक्की अर्थ काय त्यासंबंधी स्पष्टीकरण.

 

 

सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज असतो की साधना जेवढी जास्त्र तेवढी चांगली. ढोबळ मानते ते बरोबर असले तरी साधना अचूक आणि "स्मार्ट" असायला हवी. सर्वसाधारण साधकांची जीवनशैली लक्षात घेता आपण साधनेच्या नावाखाली नुसती "वायफळ मेहनत" तर करत नाही आहोत ना त्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे. त्यासाठी तुम्हाला स्वतःची "OS" शोधून काढता आली पाहिजे. तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ, साधनेतील प्रयत्न आणि त्यांची intensity, आणि तुमची life goals यांचा साधक-बाधक विचार करून तुम्हाला ती ठरवावी लागेल.

 

"कुल-कुंडलिनी उपासनेतील" काही महत्वाच्या गोष्टी. सामान्यांच्या "योग" या संकल्पनेत त्याना बसवणे अवघड आहे. मनाला पूर्वग्रह मुक्त आणि मोकळे केल्याशिवाय हा योग नीट कळणार नाही. जिथे सामान्यांचा "योग" संपतो तिथे भगवान शंकराचा "कुल-कुंडलिनी" योग सुरु होतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

असो. आज इतकंच.

कुलेश्वर आणि कुलेश्वरी सर्व वाचकांना अध्यात्ममार्गावर अग्रेसर करोत या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 16 November 2020