Kriya and Meditation for Software / IT Professionals. Conducted by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

प्रकाशाचा मार्ग आणि स्पंदनांचा मार्ग

शिवतत्व गहन तर खरेच पण त्याप्रत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत - प्रकाशाचा मार्ग आणि स्पंदनांचा मार्ग. इंद्रधनुष्यातील सप्त रंगांनी सजलेला प्रकाशाचा मार्ग आणि दशविध अनाहत नादांनी नटलेला स्पंदनांचा मार्ग. वरकरणी पाहता हे मार्ग भिन्न भासतात हे खरे पण ते आहेत एकच. जे योगाभ्यासी नाहीत त्यांना मी काय म्हणतो ते कदाचित नीटसे उमगणार नाही. पण जे योगाभ्यासी आपापल्या गुरुप्रदत्त साधनामार्गावर दृढपणे साधनारत होतीत त्यांना या मार्गांची प्रत्यक्ष अनुभूती आणि त्यांतील एकत्व एक ना एक दिवस प्रचीतीस येईल हे निश्चित. तुमच्यापैकी ज्यांना मी अजपा साधना यथाविधी शिकविली आहे त्यांना तर हा मार्ग सुलभतम वाटेल. कारण त्यांची कुंडलिनी सुखकारकपणे जागृत होऊन मग हे सगळे अनुभव टप्प्या-टप्प्याने येऊ लागतील. अर्थात त्यासाठी सांगितल्याप्रमाणे श्रद्धा, सबुरी, शिस्त आणि समर्पण यांची कास मात्र धरावीच लागेल.

आज महाशिवरात्र. अद्भूत, अतर्क्य आणि बुद्धीच्या पलीकडली ही वाटचाल तुम्हा सर्वाना सुखकारकपणे पार पाडता येवो हीच त्या जगद्नियन्त्या शंभू महादेवाच्या चरणी विनम्र प्रार्थना.
ॐ नमो आदेश ! आदेश !!

~ बिपीन जोशीबिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 24 Feb 2017