अजपा योग : कुंडलिनी जागृतीचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा राजमार्ग. बिपीन जोशी यांचे मार्गदर्शन आणि अभ्यास वर्ग. अधिक वाचा...

संगणक सल्लागार, लेखक आणि योगी बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशू या पुस्तकांची संलग्न वेब साईट. या दोन्ही पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. या वेब साईटवर वरील पुस्तकांतील निवडक मजकूर, साधना, त्यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख आणि योगविषयक माहिती प्रस्तुत करत आहोत.


अजपा योग : सशुल्क मार्गदर्शन
योगमार्गावर वाटचाल करण्याची इच्छा असणाऱ्या साधकांना कित्येकवेळा योग्य मार्गदर्शन मिळत नाही. नेमकी कोणती साधना करावी? किती वेळ करावी? कशी करावी? आपली साधना बरोबर आहे ना? असे अनेकानेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. ध्यान-धारणा, प्राणायाम, नामस्मरण यांचंही स्वतःच असं एक शास्त्र आहे. त्या शास्त्रानुसार साधना घडली तरच फायदा मिळतो अन्यथा वर्षोनवर्षे साधना करूनही काही फायदा मिळत नाही. हे लक्षात घेऊन देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांचे लेखक बिपीन जोशी यांच्याकडून अजपा योग मार्गदर्शन आणि अभ्यास वर्ग घेतले जातात.

अजपा योग ही शैव संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि एकूणच कुंडलिनी योगमार्गाची एक अत्यंत प्रभावी ध्यान पद्धती आहे. उपनिषद, पुराणे आणि योगग्रंथ एकमुखाने अजपा साधनेचा गौरव करतांना आपल्याला आढळतात. अजपा ध्यानाचे फायदे वृद्धींगत करण्यासाठी विशिष्ठ मंत्र, प्राणायाम आणि हस्त मुद्रांचा उपयोग केला जातो. ज्या वाचकांना बिपीन जोशी यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी येथे जावे. एका वेळी केवळ मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जातो.


अजपा योग - साधना आणि सिद्धी

Loading...
स्वागतयोग दर्शनकुंडलिनी शक्तिअजपा साधनासशुल्क मार्गदर्शन

देवाच्या डाव्या हाती
कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. एक नवखा साधक ते योगी या प्रवासात लेखकाला आलेल्या अडचणी आणि त्याने मोठ्या जिद्दीने त्यांवर केलेली मात याचे प्रभावी वर्णन या पुस्तकात आढळते. लेखक बिपीन जोशी यांचे विस्मयकारक स्वानुभव आणि प्रभावी मार्गदर्शन. अधिक वाचण्यासाठी येथे जा.
नाथ संकेतींचा दंशु
कुंडलिनी योगमार्ग विनाकारण गुढतेच्या आणि क्लिष्टतेच्या वलयात झाकोळला गेला आहे. सर्वसामान्य संसारी साधक कुंडलिनी योगमार्गापासून दूरच राहिला आहे. सर्वसामान्य साधकाला समजतील, जमतील आणि फायदा मिळवून देतील अशी मूलतत्वे आणि साधना यांचे सहज सोप्या भाषेत विश्लेषण करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दीष्ट आहे. लेखक बिपीन जोशी यांचे प्रभावी आणि स्वानुभवाधिष्ठित मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी येथे जा.

नुकतेच प्रकाशित झालेले लेख

योग म्हणजे...
स्वतःच स्वतःची गळाभेट घेणं म्हणजे योग. त्रिगुणांची वस्त्रे फेडून आत्म्याला सहज स्थितीत पहाणं म्हणजे योग. जन्मोजन्मींचे संस्कार धुवून निजबोध घेणं म्हणजे योग.
Posted On : 20 Mar 2017
सोहं मंत्राद्वारे ईश्वरोपासना करणारा जन्म-मृत्युच्या पलीकडे जातो
आपल्या अंतरंगात स्थित मुर्तिमान, परमानंदस्वरूप परमात्मा जो निर्मळ चित्त होऊन निरंतर बघतो तो खरा द्रष्टा. जो सर्व जीवांमध्ये स्थित असलेल्या मुर्तीमान परमानंदस्वरूप आत्म्याला आपल्या आत्म्यात स्थित झालेला जो पहातो तो खरा द्रष्टा. आपल्या शरीरातील ईश्वराला सोडून जो बाह्य ईश्वराची उपासना करतो तो जणू हाती असलेलं रत्न विसरून दुसऱ्या रत्नाचा शोध करत बसतो.
Posted On : 10 Mar 2017
अजपा ध्यानाचा प्राण आणि अपान यांच्याशी असलेला संबंध
योगशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर अजून एक अशीच जोडगोळी प्रसिद्ध आहे. त्या जोडगोळीची थोरवी अशी की ती जीवाला जन्म-मृत्युच्या आणि सुख-दु:खाच्या सापळ्यात फिरत ठेवते. ती जोडगोळी म्हणजे - प्राण आणि अपान. नाथ संप्रदायात प्राणायाम या साधना प्रकाराला अत्याधिक महत्व आहे कारण प्राणायामाचे उद्दिष्ट या प्राण आणि अपान नामक विरुद्ध शक्तींना एकत्र करून त्यांचे सामरस्य घडवण्यात आहे. शरीरात प्राण शक्ती अनेक प्रकारे कार्य करत असते. खरंतर शरीराची सर्व कार्ये प्राण शक्तीच्या आधारानेच चालत असतात. या प्राण शक्तीच्या विविध रूपांमधील पाच महत्वाची मानली जातात ज्यांना पंचप्राण असं म्हणतात.
Posted On : 06 Mar 2017
प्रकाशाचा मार्ग आणि स्पंदनांचा मार्ग
शिवतत्व गहन तर खरेच पण त्याप्रत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत - प्रकाशाचा मार्ग आणि स्पंदनांचा मार्ग. वरकरणी पाहता हे मार्ग भिन्न भासतात हे खरे पण ते आहेत एकच.
Posted On : 24 Feb 2017
चंद्र, सूर्य, सुषुम्ना नाड्यांचा दैनंदिन कार्यांशी असलेला संबंध
योगशास्त्रात चंद्र नाडी किंवा इडा नाडी, सूर्य नाडी किंवा पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी यांना किती महत्व आहे सांगायची गरज नाही. योगशास्त्रा व्यतिरिक्तही या नाड्यांचा स्वतःचा असा कार्यकारण भाव आहे. प्रत्येक नाडीचा स्वतःचा असा एक स्वभाव आहे. हा स्वभाव ओळखून जर दैनंदिन कार्य केली तर कार्य हातून अधिक सुलभतेने घडतात.
Posted On : 20 Feb 2017
आधी क्षेत्राचे ज्ञान प्राप्त करावे
आत्मा म्हणजे काय ते जाणून घेण्याआधी शरीर. देह या सर्वसाधारण नावांनी ओळखले जाणारे क्षेत्र काय आहे ते योग्याने नीट समजून घेतले पाहिजे. क्षेत्र नीट समजून घेतले की क्षेत्रज्ञ त्यांपासून वेगळा कसा आहे ते समजणे सोपे जाते. अन्यथा क्षेत्रालाच क्षेत्रज्ञ समजण्याची गल्लत नवख्या साधकाकडून होऊ शकते.
Posted On : 16 Feb 2017
आत्मसाक्षात्कारासाठी गुरुकृपा आवश्यक
गुरुकृपेच्या शक्ती विषयी संत ज्ञानेश्वर म्हणतात - हे स्नेहाळे, तुझ्यामुळे साधाकाला योगसामर्थ्य प्राप्त होते. त्याची "मी ब्रह्म आहे" ही अनुभूती घेण्याची लडिवाळ इच्छा तूच पूर्ण करतेस. कुंडलिनी शक्तीला तू कौतुकाने वाढवतेस अर्थात जागृत करतेस. मग तीला हृदयाकाशाच्या पाळण्यात घालून झोके देतेस.
Posted On : 13 Feb 2017
तद्रूपचरणी मुक्ता वटेश्वरी दक्ष
महाराष्ट्रात चांगदेव अपरिचित अजिबात नाहीत. ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरांनी भिंत चालविल्याची कथा ऐकली-वाचली आहे त्यांना चांगदेवांचा परिचय असतोच. अर्थात चांगदेवांचा हा परिचय ज्ञानेश्वरांच्या छायेत घडत असतो हे खरे. परंतु चांगदेवांवर काही संशोधन झालेले आहे आणि ते कोण, कुठले याचा शोध घेण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी यथामती केलेला आहे.
Posted On : 06 Feb 2017
योग साधनेची सहा अंगे
आसन, कुंभक, मुद्रा, ध्यान, जप आणि ब्रह्मस्मरण ही सहा अंगे ईश्वराचा जणू देहच आहेत. जो योगी यांचा निरंतर अभ्यास करतो त्याला भैतिक सुखांची भुरळ पडत नाही.
Posted On : 31 Jan 2017
कुंडलिनी योगाद्वारे आत्मसाक्षात्कार
एखाद्या मण्याला किंवा रत्नाला घासलं किंवा स्वच्छ केलं तर त्याचा मूळ रंग झळकू लागतो. त्याचप्रमाणे कुंडलिनी जेंव्हा जागृत होते आणि षटचक्रांचे भेदन करते तेंव्हा आत्मा आपल्या मूळ रुपात प्रकाशमान होतो. तो सर्व उपाध्यांपासून मुक्त होतो. त्यामुळे कुंडलिनी जागृतीद्वारे होणारा आत्मसाक्षात्कार श्रेयस्कर आहे.
Posted On : 23 Jan 2017